ग्रामसेवक
🔵 नेमणूक : जिल्हापरिषदेचे CEO करतात. (निवड जिल्हा निवड समितीमार्फत)
🔵 हा जिल्हा सेवा (वर्ग तीन) मधील कर्मचारी असून त्याचे वेतन जिल्हानिधी मधून दिले जाते.
🔵 ग्रामपंचायतीचा सचिव हाच 'ग्रामसभेचा सचिव' असतो.
🔵 ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असे म्हणतात.
🔻 पात्रता : ! तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. (15 वर्षापासून)
!! पदवीधर असावा. (2018 पासून)
!!! CEO च्या मते योग्य असावा
🔻 राजीनामा व बडतर्फी : CEO करतात.
🔻 ग्रामसेवकाचे अधिकार व कार्ये :
• गावातील विविध कर गोळा करणे.
• गावाचा ग्रामनिधी सांभाळणे.
• गावातील जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे.-
• ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे.
• सचिव या नात्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे
इतिवृत्त लिहीणे. -
• ग्रामपंचायतीचे दप्तर व्यवस्थित ठेवणे.
• ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल, हिशोब हे पंचायत समिती व जिल्हा परिषदेला सादर करणे.
• ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसंबंधी RTI 2005 अंतर्गत मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे

Post a Comment