नमस्कार मित्रांनो आजपासून आपण तलाठी भरती साठी महत्वाची प्रश्नसंच सेरीज सुरु करत आहोत. मित्रांनो आपण सर्व जन तलाठी भरती ची फार दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो. तलाठी भरतीची जाहिरात पण येऊन झाली होती आणि २६ जून २०२३ पासून तलाठी भरतीला अर्ज करायला सुरुवात देखील झाली आहे. आपण आज पासून तलाठी भरतीसाठी महत्वाची प्रश्नसंच घेणार आहोत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अत्यंत फायदा होणार आहे.मित्रांनो येणाऱ्या परीक्षा जिल्हा परिषद,दारूबंदी पोलीस,ग्रामसेवक या सर्व परीक्षा TCS मार्फत होणार आहे.म्हणून आपण सर्व प्रश्न TCS च्या मागच्या प्रश्न पत्रिकांचा आभ्यास करून काढले आहेत.
खालील सर्व प्रश्नांचा फायदा तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती तसेच ग्रामसेवक भरती या सर्व च परीक्षांसाठी होणार आहे.
TCS/IBPS
पँटर्न
तलाठी भरती प्रश्न पत्रिका २०२३(संभाव्य प्रश्न)
मराठी व्याकरण
प्रश्न १. खालील पैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता?
१) सह्याद्री
२) महाराष्ट्र
३) राष्ट्र
४) कृष्णा
प्रश्न २. पंचमुखी हनुमान हे कोणते विशेषण आहे ?
१) संख्या विशेषण
२) धातूसाधित
३) संबधी विशेषण
४) यांपैकी नाही
प्रश्न ३. "तो मुलगा चांगला खेळतो'' या वाक्यात चांगला हा शब्द________आहे ?
१) सार्वनामिक विशेषण
२) संख्या विशेषण
३) क्रियाविशेषणे
४) गुणविशेषण
प्रश्न ४. खालीलपैकी कुठले नाम भाववाचक नाही ?
१) सौंदर्य
२) गोजिरवाणा
३) आई
४) नवलाई
प्रश्न ५. ‘तपोधन’ हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे ?
१) स्वरसंधी
२) विसर्गसंधी
३) व्यंजनसंधी
४) यांपैकी नाही
प्रश्न ६. ‘मतैक्य’ या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता ?
१) मत+आईक्य
२) मत+ऐक्य
३) मत+एक
४) माती+ऐक्य
प्रश्न ७. ‘मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो’ या वाक्याचा प्रकार ओळखा ?
१) केवलवाक्य
२) प्रधानवाक्य
३) गौणवाक्य
४) संयुक्तवाक्य
प्रश्न ८. ‘स्पृहा’ या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा-
१) गरज
२) आवड
३) आवश्यक
४) इच्छा
प्रश्न ९. ‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा ?
१) निमंत्रित
२) आगंतुक
३) अकल्पित
४) यांपैकी नाही
प्रश्न १०. ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ - अलंकार ओळखा
१) अतिशयोक्ती अलंकार
२) यमक अलंकार
३) श्लेष अलंकार
४) उपमा अलंकार
प्रश्न ११. ‘वंद्य’ या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द ओळखा ?
१) निंद्य
२) क्रतघ्न
३) शत्रू
४) उदार
प्रश्न १२. पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही ?
१) सूर्य
२) पुस्तक
३) फुल
४) घर
प्रश्न १३. खालील वाक्यप्रकार ओळखा ?
“आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला”
१) केवलप्रयोगी वाक्य
२) मिश्र वाक्य
३) संयुक्त वाक्य
४) यांपैकी नाही
प्रश्न १४. पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही ?
१) गैरहजर
२) आमरण
३) तोंडपाठ
४) यांपैकी नाही
प्रश्न १५. ‘मी निबंध लिहिला असेन’ या वाक्याचा काळ ओळखा ?
१) पूर्ण भविष्य काळ
२) अपूर्ण भविष्य काळ
३) रीतिवाचक भविष्य काळ
४) साधा भविष्य काळ
प्रश्न १६. ‘वृश्चिक’ या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा ?
१) विंचू
२) साप
३) पाल
४) यांपैकी नाही
प्रश्न १७. वेळ या शब्दाचे वचन बदला ?
१) वेळी
२) काळ
३) समय
४) वेळा
प्रश्न १८. खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्द निवडा.
१) कवियित्री
२) कवयीत्री
३) कवियित्री
४) कवयित्री
प्रश्न १९. लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता ?
१) दीर्घ
२) मोठा
३) महान
४) लहान
प्रश्न २०. ‘चवड’ या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा ?
१) चढ
२) चढाव
३) ढीग
४) यांपैकी नाही
प्रश्न २१. ‘प्रताप’ या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा ?
१) मर्द
२) जनक
३) शौर्य
४) यांपैकी नाही
प्रश्न २२. मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती ?
१) ४
२) ३
३) २
४) १
प्रश्न २३. ‘माझ्याकडे पाच पुस्तके आहेत’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
१) संख्या विशेषण
२) गुण विशेषण
३) सामान्य विशेषण
४) यांपैकी नाही
प्रश्न २४. ‘यथावकाश’ या शब्दाचा समास ओळखा ?
१) द्विगुसमास
२) अव्ययीभावसमास
३) समाहारसमास
४) यांपैकी नाही
प्रश्न २५. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनी ला काय म्हणतात ?
१) वर्ण
२) स्वर
३) दीर्घ
४) यांपैकी नाही
.png)
No comments:
Post a Comment