Thursday, March 23, 2023

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग,जिल्हे व त्यांचे विभाजन


महाराष्ट्रा मध्ये किती प्रशासकीय विभाग आणि किती जिल्हे आहेत याचा सविस्तर अभ्यास आपण इथे करणार आहोत. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन कधी झाले हे देखील आपण समजून घेणार आहोत.

राज्यातील प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत तसेच प्रशासकीय विभांगाचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आपण जाणून घेऊया.
प्रशासकीय विभाग समाविष्ट जिल्हे जिल्हांची संख्या
कोकण पालघर,ठाणे,मुंबई उपनगर,मुंबई शहर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग ०७
पुणे पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर ०५
नाशिक नाशिक,अहमदनगर,धुळे,नंदुरबार,जळगाव ०५
नागपूर नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर ०६
अमरावती अमरावती,बुलढाणा,अकोला,वाशीम,यवतमाळ ०५
औरंगाबाद औरंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,परभणी,हिंगोली,लातूर,नांदेड ०८
एकूण जिल्हे ३६


                प्रादेशिक विभागातील समाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हे आणि त्यांची संख्या खाली दिली आहे.
प्रादेशिक विभाग समाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हे जिल्ह्यांची संख्या
पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागातील: पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर नाशिक विभागातील: नाशिक व अहमदनगर हे २ जिल्हे ०७
मराठवाडा(गोदावरी खोरे) औरंगाबाद विभागातील ८ जिल्ह्यांचा समावेश ०८
विदर्भ(वऱ्हाड) अमरावती विभागातील सर्व ५ जिल्हे,नागपूर विभागातील सर्व ६ जिल्हे ११
खानदेश नाशिक विभागातील : धुळे,नंदुरबार,जळगाव जिल्हे
कोकण विभाग मुंबई शहर,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग

No comments:

Post a Comment