महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल 2022 | Maharashtra State Reserve Police Force(SRPF)
नमस्कार मित्रानो काय तुम्ही पोलीस भरती ची तयारी करत आहात का? तर तुम्हाला पोलीस भरती प्रक्रिया 2022 मधील नवीन नियमांबद्दल माहित असणे गरजेचे आहे. तुम्हीं महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल 2022 | Maharashtra State Reserve Police Force(SRPF) भरती बद्दल तयारी करत असाल अणि त्याबद्दल माहिती शोधत असाल, तर तुम्ही योग्य जागी आले आहात. पोलीस भरती 2022 भरती प्रक्रियेत झालेले बदल तुम्हाला माहित आहेत का? तर आज आपन या ब्लॉग मध्ये महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल 2022(SRPF) भरती मधे झालेले नियम कोणते आहेत.
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक पात्रता चाचणीसाठी उपस्थित असणे आवश्यक असेल.
● शारीरिक चाचणी खालीलप्रमाणे एकुण १०० गुणांची असेल.
(अ) ५ कि.मी. धावणे. ५० गुण
(ब) १०० मीटर धावणे. २५ गुण
(क) गोळा फेक २५ गुण
______________________________________________
एकूण १०० गुण
● लेखी चाचणी (१०० गुण)
जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवतील असे उमेदवार, संबंधित प्रवर्गांना
प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेस
बसण्यासाठी बोलावण्यास पात्र असतील.
● लेखी चाचणीमध्येखालील विषयांचा समावेश आहे
(१) अंकगणित
(२) सामान्य ज्ञान व चालूघडामोडी
(३) बुध्दीमत्ता चाचणी
(४) मराठी व्याकरण.
● लेखी परीक्षेत विचारलेले प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील व परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी
चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
● उमेदवारांना लेखी चाचणीमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परिक्षेमध्ये ४०
टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
● जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवतील असे उमेदवार, प्रसिध्द
केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १ :१० या प्रमाणात लेखी परीक्षेस बसण्यासाठी
बोलाविण्यास पात्र असतील.
उदाहरणार्थ,
जर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १० जागा (10×10=100)
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 5 जागा (10×5=50)
असे उमेदवार लेखी चाचणीसाठी गुणवत्तेनूसार सूचीबध्द होतील.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल 2022(SRPF) साठी खालीलप्रमाणे जागा आहेत.
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) | 1201 |

Post a Comment